Breaking News

हजारो दिवे पेटवून फटाकेमुक्तीचा केला संकल्प,संगीताच्या तालावर नाचली बालके

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर -  रांगोळ्यांनी सजलेले अंगण,दिव्यांनी उजळलेला परिसर,संगीताच्या तालावर आनंद लुटत बडीसाजन सांस्कृतिक भवन येथे शहरातील वंचित  घटकातील मुलांनी दिवाळीचा मनमुराद आनंद लुटला.निमित्त होते लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या दीपोत्सवाचे.
वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सालाबादप्रमाणे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.क ार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.एस.एस.दीपक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्सचे उपप्रांतपाल रमेश शहा,झोन चेअरमन किरण भंडारी,उद्योजक शरद  मुनोत,अध्यक्ष जस्मितसिंग वधवा,सचिव आनंद बोरा,खजिनदार डॉ मानसी असनाणी,कमलेश भंडारी,मनीष सोमाणी,भावना छाजेड,नितीन शाह,ज्योती दिपक,हरजितसिंग वधवा,महेश  देशमुख,सुधीर लांडगे,अमित लोढा,महेश चांडक,अरुण झंवर,मोहन लुल्ला, वेंद्रसिंग वधवा आदिंसह क्लबचे सदस्य व सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.क ार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष जस्मितसिंग वधवा यांनी क्लबच्या वतीने चालू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.पाहुण्यांचे स्वागत कमलेश भंडारी यांनी केले.डॉ.दीपक  म्हणाले की, सत्य व प्रामाणिकपणाला जीवनात अनन्यसाधारण महत्तव आहे.प्रमाणिकपणा यशस्वी जीवनाचा पाया आहे.आपल्या कृतीतून सद्भावना,प्रेम,आस्था व सर्वांबद्दल कृतज्ञता  निर्माण झाली पाहिजे.हे आत्मविश्‍वास,जिद्द व मेहनतीने जीवनात यशस्वी होता येत असल्याचे सांगून, यशस्वी झाल्यावर गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले. वंचित घटकांबरोबर  लायन्सने खरी दिवाळी साजरी केली आहे. उद्याचे भविष्य असलेल्या लहान मुलांसाठी लायन्स घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उद्योजक शरद मुनोत यांनी व्यक्त के ली.
दुपारी 3 वाजल्या पासून चाईल्ड लाईन,बालभवनच्या विद्यार्थ्यांसह,श्रीगोंदा,उत्कर्ष बालभवन,युवान,स्नेहालय रिहाब सेंटर,सष्कीया बालगृह,बाबावडी,रामकरण सारडा,केअरिंग फ्रें ड्स,अनाम प्रेम,सावली,यतीमखाना,गाडगे महाराज,आठरे पाटील संस्थेचे सुमारे 1200 विद्यार्थी दीपोत्सवात सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीक रण केले.या कार्यक्रमासाठी परदेशी पाहुणे देखील उपस्थित होते.रिदम अ‍ॅकॅडमीचे अजितसिंग वधवा व त्यांच्या सहकारी कलाकारांनी सादर केलेल्या संगीतमय कार्यक्रमाचा उपस्थित  विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.तर उपस्थित विद्यार्थ्यांसह लायन्सच्या सदस्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. दीपोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या किल्ला बनवा,चित्रकला व नृत्य  स्पर्धेचे बक्षिस वितरण उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांना फटाकेमुक्तीचे आवाहन करत परिसरात दिवे प्रज्वलीत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ व  अल्पो पहाराचे वाटप करण्यात आले.प्रसाद बेडेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.सुनील छाजेड यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय भंडारे,हरजितसिंग  वधवा,प्रशांत मुनोत,आनंद बोरा,विपुल शाह,योगेश भंडारी, दिलीप कुलकर्णी, डॉ.संजय असणानी,संदेश कटारिया,बंटी कबरा,मोहनशेठ लुल्ला,मनिष सोमानी,गणेश लड्डा,अमित क ाबरा,सहेज वधवा,राजवीरसिंग संधू,विजय कुलकर्णी,अवी मुथा आदीसह जय आनंद ग्रुप,चाईल्ड लाईन व स्नेहालयाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.