खानापूर नगरपंचायतीस एक कोटीचे पारितोषिक
सांगली, दि. 16, आक्टोबर - राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातर्ंगत खानापूर नगरपंचायतीस एक कोटी रूपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या जाहीर पारितोषिक ापोटी 30 लाख रूपयांचा पहिला हप्ता खानापूर नगरपंचायतीस मिळाला आहे, अशी माहिती खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अलीअकबर पिरजादे यांनी दिली.
स्वच्छ खानापूर, सुंदर खानापूर या ध्येयानुसार खानापूरवासियांनी काम करून खानापूर नगरपंचायतीने हागणदारीमुक्त खानापूर हे स्वच्छता अभियान अत्यंत नियोजनबध्द रितीने व नागरिकांना प्रोत्साहित करून यशस्वीपणे राबविले. सर्वांच्या चांगल्या सहभाग व सहकार्यामुळेच अभियान यशस्वी झाले व नगरपचायत एक कोटी रूपयांच्या पारितोषिकास पात्र ठरली.
या पारितोषिकाच्या रकमेतून खानापूर शहरातील उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहास शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, मुख्याधिकारी, नगरपंचायत सदस्य व नागरिकांनी सहकार्य करून विशेष परिश्रम घेतले. या अभियानातर्ंगत जाहीर झालेल्या पारितोषिकापोटी 30 लाख रूपयांचा प हिला हप्ता नुकताच नगरपंचायत प्रशासनास प्राप्त झाल्याचे अलीअकबर पिरजादे यांनी सांगितले.