बस पुलावरून खाली कोसळल्याने दोन ठार चाळीस जखमी
लातूर, दि. 16, आक्टोबर - लातूर जिल्ह्यात औराद कडून उदगीरकडे येणारी बस (क्र. केए. 38 एफ 538) शेल्हाळजवळ पुलावरून खाली कोसळली. यात दोन जागीच ठार झाले तर 40 जन जखमी झाले आहेत. जखमींवर उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.ही बस कर्नाटक आगाराची होती. समोरून येणार्या दुचाकीस साईड देण्याच्या प्रयत्नात ही बस पाच फूट खड्ड्यात कोसळली. खड्ड्यात पडताच बस पलटी झाली. त्यामुळे या अपघाताची तीव्रता आणि नुकसान अधिकच वाढले. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. मृतात 19 वर्षीय ममता रमेश सगर (रा. मुर्की ता.औराद जि. बिदर) या तरुणीचा समावेश आहे.