Breaking News

संत एकनाथ रंगमंदीराच्या दुरावस्थेची दिवाळीच्या पहाटे चर्चा

औरंगाबाद, दि. 24, ऑक्टोबर - दिवाळी पहाट निमित्त संत एकनाथ रंगमंदीरात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी या नाट़यगृहाच्या दुरवस्थेबददल प्रश्‍न उपस्थित केले. क ार्यक्रमाच्या मध्यंतरात मान्यवरांच्या सत्कारात यापुढे येथे कार्यक्रम घेऊ नका, असे चव्हाण यांना मान्यवरांनी जाहीरपणे सुचविले. संत तुकाराम नाट़यगृहात दिवाळी पाडवा पहाटनि मित्त पंडित उपेंद्र भट यांचा शास्त्रीय गायनाचा व श्रीकांत नारायण व त्यांच्या चमूंचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी क ाँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे होते. 
संत तुकाराम नाट़यगृहातील रंगमंचाचा मुख्य पडदाच बंद आहे. मागील बाजूचे पडदेही नाहीत. म्युझिक यंत्रणा बंद आहे. अनेक ठिकाणची वायरिंग
दुरुस्तीला आलेली आहे. मुख्य सभागृहात प्रवेशापूर्वीच्या भागात छताच्या खाली लावलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे आच्छादन गळून पडले आहेत याची जाहिर चर्चा या वेळी झाली.  तीन-चार महिन्यांपूर्वी अभिनेता सुमीत राघवन यांनी संत एकनाथ’च्या खिळखिळ्या झालेल्या फळ्यांची चित्रे फेसबुकवर टाकली होती याचा राग खासदार खैरे यांना आला होता.  त्यानंतर शिवसेना आमदार संजय सिरसाट, खासदार चंद्रकांत खैरे यांनी भेट देऊन मदतीसाठी निधीची घोषणा केली. त्यानंतरही दुरुस्तीच्या कुठल्याही कामाला सुरुवात झालेली  नाही. शहराच्या सिडको भागातील संत तुकाराम नाट़यगृहाचीही देखभालीअभावी कशी वाताहत झाली आहे, याचीहि चर्चा या वेळी झाली.