Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून मुंबई येथून अल्पवयीन मुलीस पळवणा-यास जालन्यात अटक

जालना, दि. 24, ऑक्टोबर - मुंबई येथून एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणलेल्या तरूणाला पोलिसांनी पकडले असून गेल्या चार दिवसापासून मुंबईच्या  साकीनाका पोलिस ठाण्याचे पोलिस या तरूणाच्या शोधात होते जागरूक नागरिकामुळे हा तरूण पोलिसांना सापडला.
या बाबत सविस्तर हकीकत अशी की जालना शहरातील मोंढा परिसरातील हिंदनगरात एक जोडपे भाडयाने खोली घेऊन राहत होते. खोली मालकाला त्यांनी आम्ही पती-पत्नी  असल्याचे सांगून खोली मिळविली. मात्र परिसरातील लोकांना या जोडप्याबाबत संशय आला या जागरूक नागरिकांनी चंदनझिरा पोलिसांना या बाबत कळवले .पोलिसांनी त्यांची  चौकशी केली असता सत्य बाहेर आले. काजूपाडा येथील इम्रान शाहा मशिरोद्दीन शाहा (22)याने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले होते मुलीच्या  पालकांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादिवरून साकीनाका पोलिसांनी संशयित इम्रान शाहा विरूध्द 19 ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला होता. काल रात्री उशीरा चंदनझिरा पोलिसांनी  या जोडप्याला मुंबई येथील साकीनाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.जागरूक नागरिकांमुळे ही घटना समोर आली.