Breaking News

साठे चौक वाहतुकीसाठी खुला करण्याची आमदारांची मागणी

बीड, दि. 24, ऑक्टोबर - शहरातील साठे चौक वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे के ली आहे बीड शहरातील मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी साठे चौकातूनच जावे लागते ,मात्र या चौकात वाहतुकीची कोंडी होत होती त्यामुळे पोलीसांनी बँरीकेट टाकून हा रस्ताबंद के ला होता.आता बायपास सुरु झाल्यामुळे मोठी व जड वाहने बायपासकडून सुरु झाले आहेत. शहराची वाहतुकीची कोंडीही
कमी झाली आहे, त्यामुळे साठे चौकातील बँरीकेट काढून सुभाष रोडकडे वाहतुक सुरु करावी असं त्यांनी निवेदनात म्हटले आहे.