Breaking News

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या 15 विद्यार्थ्यांची विभागस्तर योगासन स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर, दि. 01, ऑक्टोबर - गुणवत्तापुर्वक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अमृतवाहिनी महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून अमृतवाहिनी अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या 15 विद्यार्थ्यांची विभागस्तर योगासन स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य केशवराव जाधव यांनी दिली आहे.
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राय, पुणे जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय , अहमदनगर आयोजित योगासन जिल्हास्तर शालेय  क्रिडा स्पर्धा 2017-2018 नुकत्याच वाडिया पार्क येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. 14 वर्षे  वयोगट मुले यात वैभव मिसाळ हा तिसरा, सुरज वाजे पाचवा, भारत मिसाळ सहावा आला असून 14 वर्षे वयोगट मुलींमध्ये अश्‍विनी पिंपळे दुसरी, रोहिनी पिंपळे  तिसरी, शिवानी पिंपळे चौथी व अनुसया पवार सहाव्या क्रमांकाने आली आहे. तसेच 17 वर्षे मुले व मुली वयोगटात  वयोग लक्ष्मण धादवड चौथा, प्रिती घाटकर  तिसरी, माधुरी कातोरे पाचवी, 19 वर्षे मुली वयोगटात रेखा पवार दुसरी, प्रतिक्षा पवार तिसरी, शकुंतला काळे चौथी, आर्या जाधव पाचवी, ललिता डहाळे सहाव्या  क्रमांकाने आली आहे.  या सर्व विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक हेमंतकुमार पंधारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रायाचे मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात,आमदार डॉ.सुधीर तांबे,उपाध्यक्ष बाळासाहेब पा.गुंजाळ,अ‍ॅड.आर.बी.सोनवणे,  नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्‍वस्त सौ.शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अनिल शिंदे, मॅनेजर प्रा.व्हि. बी.धुमाळ , प्राचार्य के.जी. जाधव, प्राचार्या  श्रीमती हजारे, प्राचार्या श्रीमती रहाणे, सौ डंग, सौ.रनाळकर, सौ. जाधव व सानप सर यांनी अभिनंदन केलेे आहे.