Breaking News

पक्षाअंतर्गत निवडणुकांसाठी काँग्रेसच्या बैठकीत ठराव

बुलडाणा, दि. 01, ऑक्टोबर - बुलडाणा कॉग्रेस पक्षाअंतर्गत निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रक्रीये दरम्यान प्रत्येक तालुका स्तरावर बैठका घेवून निवडणुकी  संदर्भात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अवगत करण्यात येत आहे. या अंतर्गत बुलडाणा तालुका व शहर कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्तांची बैठक 25 सप्टेंबर रोजी  अखिल भारतीय कॉग्रेस कमेटी सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, विजय अंभोरे, पक्षनिरीक्षक सुरेश गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 
या बैठकीत कॉग्रेस अंतर्गत निवडणुकी बाबत पक्ष श्रेठी मुकूल वासनिक जो निर्णय घेतील तो इथल्या संघटनात्मक कार्यकार्तास मान्य असल्याचा ठराव रिझवान  सैदागर यांनी मांडला असता त्या ठरावाला दत्ता काकस व विनोद बेंडवाल यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. तालुका अध्यक्ष सुनिल  तायडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषविले. प्रास्ताविक महेंद्र बोर्डे यांनी तर संचालन शरद राखोंडे यांनी केल. यावेळी बाबासाहेब भोंडे, समाधान हेलोडे, सतिश  मेहेंद्र, दिपक रिंढे, डॉ. देवकर, सुनिल सपकाळ, नंदू शिंदे, राजीव काटकर, कौतिकराव पाटील, मुस्ताक, गजानन लांडे, तेजराव सावळे, रसुल खान, चाँद मुजावर,  अमोल तायडे, सुरेश पाटील, समाधन पाटील, रविंद्र भाकरे, गजानन भुसारी, सुखदेव पवार, ोकानंद डांगे, विनोद पवार, गोविंदा पवार, गजनफर खान, आरिफ  खान, सय्यद आसिफ, बबलु मावतवार, योगेश परसे, अनिल वारे, अजय बिल्लारी, इरफान कुरेशी, बाबुराव सोनुने, शिवाजी देशमुख, मनोहर जाधव, राजीव जाधव,  अ‍ॅड. राज शेख, सुनिल पनपालिया, अन्सार, बाळा मोरे, बाबु चौधरी, विकास देशमुख, रमेश खंडारे, ज्योत्स्ना जाधव यांच्यासह कॉग्रेसचे कार्यकर्त उपस्थितीत होते.