शाळाबाह्य विद्यार्थ्यांकडून पणती-राख्यांची निर्मिती, शहरात विक्रीप्रदर्शन
पणे, दि. 16, आक्टोबर - शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जातात. त्यांना भविष्यात उपयोगी पडेल असे व्यवसाय प्रशिक्षणही देण्यात येते. या प्रक्षिणातून त्यांनी यंदा दिवाळीनिमित्त पणत्या व रक्षाबंधन सणासाठी राख्या तयार केल्या आहेत.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या व्यवसाय प्रशिक्षणाअंतर्गत करण्यात आलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन शहरात भरविण्यात आले आहे. या 2 दिवस चालणार्या प्रदर्शनात बालकामगार प्रकल्पाच्या प्रशिक्षकांनी साकारलेल्या सिरॅमॅक पणत्या, इकोफ्रेंडली आकाशदिवे, साध्या पणत्या, पाचपणती, स्टॅन्ड, पॉट अशा विविध वस्तुंनी सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वस्तू बाजारातील किमतीच्या मानाने अधिक आकर्षक आणि स्वस्त आहेत. व्यवसाय शिक्षणामुळे शाळाबाह्य मुलांना वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.