Breaking News

शिक्षण-औद्योगिक क्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानाचा वापर वाढणार’

पुणे, दि. 01, ऑक्टोबर - येत्या काळात शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून त्याचा देशाला फायदा होणार आहे. यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोत्साहन देत आहेत. यासाठी हे सरकार राज्यांतर्गत विद्यापीठांची व्याप्ती वाढवणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी  सांगितले.
पुण्यातील आयुका संस्थेमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग आणि परमाणु ऊर्जा विभागाच्यावतीने शोध, शिक्षा आणि समिक्षा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या देशात मनुष्यबळ विभागाच्यावतीने नविन शिक्षण धोरण तयार करण्यात येत आहे. यामध्ये संशोधन, शिक्षणातील सुसूत्रता, गुणवत्ता, कौशल्य यावर भर दिला  जाणार असल्याचे यावेळी जावडेकरांनी म्हटले. ’स्वयम’च्या माध्यमातून सध्या देशात शिक्षकांना विविध विषयाचे धडे दिले जात आहेत. यासाठी देशात 12 लाख  शिक्षकांनी नोंदणी केल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.