Breaking News

धानोरी येथे ज्येष्ठ महिलेचा गळ्यावर वार करून खून

पुणे, दि. 01, ऑक्टोबर - धानोरी येथे एका ज्येष्ठ महिलेचा गळ्यावर वार करून खून करण्यात आला. ही घटना काल (दि.30) रात्री आठ ते अकराच्या दरम्यान  घडली. राधा माधवन (वय 68, रा. अंबानगरी सोसायटी, धानोरी, पुणे), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री  सव्वाबाराच्या सुमारास विश्रांतवाडी पोलिसांना फोनद्वारे कोणीतरी अज्ञात इसमाने राधा माधवनचा खून झाल्याची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याची प्रथमदर्शनी जाणवत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.