Breaking News

बंदी असलेली कीटकनाशके आढळल्यास कृषी अधिकारी जबाबदार - विजयकुमार इंगळे

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - यवतमाळ जिल्ह्यात शेतांमध्ये कीडनाशकांची फवारणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतक-यांचा मृत्यु होण्याचा घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर कृ षी विभागाने आता शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शेतक-यांनी शेतांमध्ये फवारणी करतांना आवश्यक सर्व प्रकारची काळजी घ्यावी.तसेच बंदी  असलेली कीडनाशके आढळल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल,अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी नगर मध्ये  पत्रकारांशी बोलतांना दिली.
यवतमाळ येथील तणनाशक फवारताना झालेल्या विषबाधेच्या घटनेच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात जनजागृती कऱण्यात येत आहे.त्या पार्श्‍वभूमीवर इंगळे आणि जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी हे आवाहन केले आहे.कृषी यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यशाळा आयोजित करुन शेतकर्‍यांपर्यंत जनजागृती कशा पद्धतीने  करावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे.तालुकास्तरावर कृषी सेवा केंद्र चालकांनाही सूचना देण्यात आल्या असून बंदी घालण्यात आलेली कीडनाशके आणि तणनाशके विक्री क रताना आढळल्यास कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.शेतकर्‍यांनी कीटकनाशकांची हाताळणी काळजीपूर्वक करावी,कीटकनाशका च्या पॅकेटसोबत दिलेल्या सूचनांचे  पालन करावे,शिफारशीप्रमाणेच कीटकनाशकांची मात्रा वापरावी, फवारणी पंप गळत नसल्याची खात्री करावी,फवारणी करताना डोळ्यांना अपाय होऊ नये म्हणून चष्मा वापरावा,नाक ाला रुमाल बांधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.फवारणी करताना धुम्रपान करु नये,शक्यतो सकाळच्या वेळीच फवारणी रावी तसेच फवारणीनंतर अंघोळ करण्याबाबत दक्षता  घेण्याचे आवाहन इंगळे यांनी केले आहे.पूर्वकाळजी घेऊनही कीटकनाशके अथवा तणनाशके फवारणी करताना त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कृषी सेवा केंद्र  चालकांनी बिगर नोंदणीकृत पीक वाढ संजीवके आणि इतर उत्पादनांची विक्री परवानाधारक दुकानामधून करु नये,असे स्पष्ट करण्यात आले आहे.फवारणी करताना पूर्वकाळजी  म्हणून शेतकर्‍यांनी सुरक्षिक कीट वापरावे यासाठी जिल्ह्यात असे कीट काही प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व कंपन्यांना सांगण्यात आले आहे.जेणेकरुन शेतकर्‍यांना तशा  स्वरुपाची काळजी घेणे शक्य होईल, असे इंगळे यांनी सांगितले.