Breaking News

जळगावच्या हमालाचा प्रामाणिकपणा; 90 हजार केले बँकेस परत

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - रिजर्व बँकेच्या आदेशानुसार चलनात नव्याने आलेल्या 200 रुपयांच्या नोटा जळगावात सोमवारी, येथील स्टेट बँकेत बदलवून देण्यात येत होत्या.  त्यावेळी येथे मेहरूण परिसरातील रहिवाशी मुनीरोद्दीन मोहम्मद्दीन पिरजादे हे पैसे घेण्यासाठी आले. यावेळी बँकेच्या ऑफिसरकडून चुकीने या हमाली काम करणार्यास जास्तीचे 90  हजार रुपये आले. मात्र पिरजादे यांनी हे पैसे परत करून आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला.
मुनीरोद्दीन पीरजादे हे सोमवार रोजी 10 हजार रुपयांच्या बदल्यात 200 रुपयांच्या नवीन नोटा बदलून घेण्याकरीता 16 तारखेला स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत गेले होते. बँकेतील ख जिनदार रविंद्र देशपांडे यांच्याकडून नजर चुकीने 20 रुपयांच्या एैवजी त्यांना 200 रुपयांच्या नविन चलन असलेल्या 1 लाख रुपयांच्या नोटा देण्यात आल्या. मुनीरोद्दीन घरी  गेल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी स्था. गु. शाखेचे पो. नि. सुनिल कुराडे यांच्याशी संतोष ढिवरे व गमीर शेख यांच्या माध्यमातुन संपर्क साधला. कुराडे यांनी हा प्रकार  पोलिस अधिक्षक कराळे आणि अपर पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांना सांगितला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार दोन कर्मचारी मेहरूण परिसरात पाठवून पिरजादे यांना स्था.गु.शाखेच्या क ार्यालयात बोलवून घेतले. तसेच बँकेचे कॅश ऑफिसर रविंद्र देशपांडे यांना संपर्क करून बोलवून घेतले. जास्त आलेली 90 हजारांची रक्कम परत करण्यात आली. कष्टकरी व्यक्तीचे  प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांना बक्षिस म्हणून रविंद्र देशपांडे यांनी 10 हजार रुपयांचे बक्षिस दिले.