Breaking News

धर्मनिरपेक्षवाद्यांना रोहींग्यांचा पुळका का?

दि. 01, ऑक्टोबर - कुठल्याही देशाचे सरकार सिमा संरक्षणाला प्राधान्य देऊन राष्ट्राची सुरक्षा अबाधित ठेवण्याला प्राधान्य देते,यात कुणालाही आक्षेप असण्याचे  कारण नाही.भलेही मानवतावादी धोरण अजेंठ्यावर असले तरी स्वनागरिकांचा बळी देऊन कुठलेच राष्ट्र मानवतावाद जपणार नाही.असा मानवतावाद अभिप्रेत असणारे  मानवतावादी असू शकत नाही.त्यांचा मानवतावाद मिथ्थ्या असतो.सिमेपलीकडचा मानवतावाद जपण्यासाठी अंतर्गत मानवतावाद बळी द्यायचा हे कुठल्या नैतिक  धोरणात बसते असा सवाल विद्यमान परिस्थिती मानवतावादी पुरोगाम्यांना विचारीत आहे.
सध्या म्यानमार मधून स्थलांतरीत झालेल्या रोहीःग्यांचा प्रश्‍न चर्चेत असून ते भारतात शरणार्थी म्हणून आश्रीत होऊ पहात आहेत.रोहींग्यांना भारताने शरणार्थी समजून  आश्रय द्यावा यासाठी एक पुरोगामी मानवतावादी गट सरकारवर दबाव आणू पहातो आहे.
या मुद्यावर केंद्र सरकारने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.रोहींग्या हे शरणार्थी नाहीत.तर भारतात बेकायदेशीर प्रवेश करणारे घुसखोर आहेत असे प्रतिज्ञापञ भारत  सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.भारत सरकारची ही भुमिका समजून न घेता काही धर्मनिरपेक्ष मंडळी आक्रस्ताळेपणाने केंद्र सरकार विरूध्द रान पेटवू  पहात आहेत.रोहींग्या कोण आहेत? त्यांचा वांशिक आणि सामाजिक इतिहास काय आहे? म्यानमारमाध्ये कुठला पराक्रम त्यांना हद्दपार होण्यास कारणीभूत ठरला या  गोष्टी धर्मनिरपेक्षवाद्यांना माहीतच नाहीत असे म्हणणे धाडसाचे ठरेल किंबहूना त्यांच्या ज्ञानाची इज्जत घेण्याचा तो आगाऊपणा ठरेल.म्हणजेच रोहींग्याचे सारे उपद्व्याप  माहीत असूनही,भारतात ही मःडळी स्थीर स्थावर झाल्यानंतर भारताच्या राष्ट्रीय ऐक्याला त्याची कशी झळ बसू शकते याचे आकलन असतानाही ही मंडळी केवळ  सरकारला विरोध करायचा म्हणून रोहींग्याविषयी पुळका दाखवत असेल ही गंभीर बाब आहे.स्वबुध्दीवर फाजील विश्‍वास आसलेली ही मःडळी इतिहासातून कुठलाच  धडा घ्यायला तयार नाही.त्यांचा धर्मनिरपेक्षवाद बेगडी आहे.असे म्हणण्यास ही वस्तूस्थिती पुरेसा वाव देते.
रोहींग्यांचे पराक्रम जाणून घेण्यासाठी हजारो वर्षांचा इतिहास चाळण्याची गरज नाही.तो भयंकर आहेच.पण अगदी अलिकडच्या काळातील काही प्रसंग रोहींग्यांच्या  अतिरेकीपणावर शिक्कामोर्तब करण्यास पुरेशा असतांना भारतातील धर्मनिरपेक्षवाद्यांना त्यांचा पुळका का यावा हे एकविसाव्या शतकातील मोठे कोडे आहे.
म्यानमारमध्ये रोहींग्यांनी घातलेला हैदोस त्यांच्यावर ही वेळ येण्यास कारणीभूत ठरला.वास्तविक म्यानमार बौद्ध धर्मीय देश आहे,जगाला शांतीचा देणारा बौध्द धर्मीय  देश रोहींग्यांच्या बाबतीत इतकी निर्दयी भुमिका कशी घेऊ शकतो.या प्रश्‍नाचे उत्तर धर्मनिरपेक्षमंडळींना ठाऊक नसावे इतके ते घरकोंबडी बनलेत का? म्यानमारने  रोहींग्यांना हद्दपार केल्यानंतर आपल्या शेजारचा एकही देश अगदी इस्लामी देशही रोहींग्यांना त्यांच्या सिमा ओलांडू द्यायला तयार नाहीत यामागचे खरे कारण  धर्मनिरपेक्ष का जाणून घेत नाहीत.भारताने त्यांना सन्मानाने आश्रय द्यावा,त्यांचे पुनर्वसन आणि कायमस्वरूपी पालनपोषन करावे असा या मंडळींचा आग्रह  आहे.भविष्यात रोहींग्या भारतात स्थिर स्थावर झाल्यानंतर भारताच्या एकात्मतेला,स्वातंञ्याला,सार्वभौमत्वाला ते आव्हान देणार नाहीत याची हमी हे धर्मनिरपेक्ष देणार  आहेत का?