Breaking News

बाँड नियमित न करणार्‍या 188 डॉक्टरांवर कारवाई

सोलापूर, दि. 17, ऑक्टोबर - डॉ.व्ही. एम. शासकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदव्युत्तर पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवा बजावणे बंधनकारक आहे.  परंतु बहुतांश डॉक्टर सेवा बजावत नाहीत. केलेला बाँड पाळल्याने त्यांचे नूतनीकरण होत नाही, अशा महाविद्यालयातील 188 जणांचा समावेश आहे. 2001 ते 2011 दरम्यानच्या  डॉक्टरांचा समावेश आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी दिली.वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्षापर्यंत ग्रामीण भागातील दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून  कामकाज करावे लागते. त्यानुसार पुढील प्रमाणपत्र नूतनीकरण होते. डॉक्टरांनी बाँडनुसार सेवा बजावली नाही तर नोंदणी रद्द होते. नोंदणी करण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्यास नों दणी होते. परंतु आकारण्यात आलेला दंड भरावा लागतो. शासन दंड का करते की, ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा मिळावी, हा त्यामागील हेतू आहे. नोंदणी करताच डॉक्टर सेवा  बजावत असतील तर त्यांचा समावेश पदवी असूनही बोगस डॉक्टरांमध्ये होतो, असे डॉ. घाटे म्हणाले.