Breaking News

जिल्हा कारागृहामध्ये चष्मेवाटपाचा कार्यक्रम

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - अहमदनगर जिल्हा कारागृहामध्ये समता फाउंडेशनच्या वतीने कैद्यांना चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अधीक्षक एन.जी.सावंत,सिनियर  जेलर शेडगे,जेलर धोत्रे,डॉ.खंडागळे, आदी उपस्थित होते.
मागील महिन्यामध्ये कारागृहामधील कैद्यांसाठी समता फाउंडेशनच्या मदतीने कारागृहातील अधिकार्‍यांनी डोळे तपासणी शिबीर आयोजित केले होते.या शिबिरामध्ये कैदी तसेच अधिक ारी व कर्मचाऱयांचे डोळ्यांची तपासणी केली होती.यावेळी कैद्यांना असणार्‍या डोळयांच्या आरोग्यविषयीच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय योजना सांगितल्या.यामध्ये 75 कै द्यांना दिसण्यास अडचण येत होती.या कैद्यांना त्यांच्या नम्बरनुसार शनिवारी मोफत चष्म्याचे वाटप केले. यावेळी बोलताना शेडगे म्हणाले, कैदी हा गुन्हेगार नसून माणूस आहे त्याची  प्रवृत्ती गुन्हेगारी स्वरूपाची असते . या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही प्रवृत्ती नष्ट करण्याचे काम करत असतो.त्यातून एक चांगला माणूस घडवणे हाच उद्देश  आहे. कैद्यांना अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात.त्यासाठी अनेक उपाययोजना याठिकाणी चालू असतात. हा चष्मे वाटपाचा  उपक्रम याचाच एक भाग आहे.
कारागृहामध्ये अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जातात.या उपक्रमांचे  समाजातून कौतुक आहे.