Breaking News

180 शेतकरी संघटनांची मोट बांधणार

मोदी सरकार विरोधात 20 नोव्हेंबरला दिल्लीत मोर्चा : खा.शेट्टी 

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - देशातील 180 शेतकरी संघटनांची एकत्र  मोट बांधुन नरेंद्र मोदी सरकारला  शेतकरी विरोधी धोरणांचा जाब विचारण्यासाठी दिल्ली येथे 20  नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. सुमारे 10 लाख शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होतील अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी  यांनी रविवारी रात्री दिली.
मंचर येथील शिवाजी चौकात शेतकरी मेळावा संपन्न झाला. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना बचाव संघर्ष यात्रेचा शुभारंभ तसेच कर्जमाफी व्हावी या संदर्भात झालेल्या  मेळाव्याप्रसंगी खासदार राजु शेट्टी बोलत होते.यावेळी  वस्त्रोद्योग मंडळारचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, पश्‍चिम महाराष्टाचे प्रमुख प्रकाश वालवडकर,स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे  अध्यक्ष प्रकाश पोकळे, जयप्रकाश परदेशी, बापु कोरडे या मेळाव्याचे निमंत्रक पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, गणेश खानदेशे, जालिंदर बिबवे, दिलीप बाणखेले,  शांताराम भैय्ये, संजय चिंचपुरे, कमरअली मनियार, विनोद घुले, नियाज गोरे, जितेंद्र थोरात, रामा थोरात भक्ते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यासाठी अनेकांना प्रलोभणे दाखविली. आम्हास वाटले शेतकर्‍यांचे हित जोपासुन शेतकरी आर्थिकदृष्टया समृद्ध होईल.शेतकरी आत्महत्या  थांबतील.परंतु सत्ता गृहण केल्यावर नरेंद्र मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या विरोधी निर्णय घेतल्याने लागल्याने आम्ही सत्तेत बाहेर पडलो असे सांगुन खासदार राजु शेट्टी म्हणाले,  सत्तेवर आम्हीच त्यांना आणले आता सत्तेवरून घालविण्यासाठी देशभर दौरे चालु असुन सरकार विरोधी वातावरण तयार झाले आहे.त्यामुळे येणार्‍या 2019 निवडणुकांमध्ये मोदी  सरकारचा सफाया करण्यासाठी शेतकर्‍यांनी एकजुुटी दाखविली पाहीजे.संघटीत होवुन नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करू असे सांगुन खासदार राजु शेट्टी म्हणाले, शेतीमालांची निर्यात  गेल्या 3 वर्षात 42 हजार डॉलर वरून 32 हजार डॉलरवर आली आहे.यावरूनच शेती मालांबाबत सरकारचे संरक्षण कसे आहे. याची जाणीव होती.भीमाशंकर सहकारी साखर क ारखान्याच्या जवळच खाजगी साखर कारखाना होतो. यामुळे सहकार चळवळ धोक्यात येण्याची भीती खासदार राजु शेट्टी यांनी व्यक्त केली. सहकारी साखर कारखाने मोडीत क ाढण्याचे धोरण असुन खाजगी कारखाने नफ्यात आणुन मनमानी करणार्‍या धोरणाचा निषेध करून दुध व्यवसाय आणि साखर व्यवसायाबाबतच्या सरकारच्या धोरणावर खासदार  राजु शेट्टी यांनी जोरदार टिका केली. दिवाळीनंतर बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत दिवाळीनंतर दिशा ठरवली जाईल. प्राणीमित्र संघटनांच्या भुमिकेबाबत राजु शेट्टी यांनी तीव्र  शब्दांत संताप व्यक्त केला. बैलगाडा शर्यत सुरू होण्याबाबत आपण जाणीवपुर्वक प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार राजु शेट्टी यांनी दिली.
पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले यांनी तालुक्यातील खासदार आणि आमदार यांच्या कार्यपद्धतीवर  जोरदार टिका केली. ते म्हणाले,  दोघा नेत्यांनी  तालुक्यातील  जनतेस झुलवत ठेवुन विकास कामांऐवजी स्वतःचा विकास केल्याची टिका केली. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी आंबेगाव, शिरूर तालुक्यातील विविध गावांत  जावुन संघर्ष यात्रेच्या माध्यमातुन  चळवळ उभी केली जाईल. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी दिलीप बाणखेले यांची निवड  झाल्याबद्दल सत्कार क रण्यात आला. जालिंदर बिबवे, रविकांत तुपकर, प्रकाश वालवडकर, प्रकाश पोकळे यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन सुभाष जाधव आणि आभार कमरअली मनियार यांनी मानले.