Breaking News

सत्तेत राहून भाजप सरकारवर अंकुश ठेवणार - उद्धव ठाकरे

मुंबइ, दि. 01, ऑक्टोबर - भाजप सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही सत्तेत आहोत. आम्ही गोरगरिबांसाठी सत्ता राबवत आहोत . शिवसेनेने सत्तेत राहून या  पुढेही लोकहिताचे निर्णय घ्यायला भाग पाडू असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्दाहव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना केले. या मेळाव्यात  उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली . सरकारच्या चुकीच्या कारभाराविरोधात शिवसेना या पुढेही रस्त्यावर येऊन आंदोलन करेल असेही त्यांनी  बजावले . पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला स्वबळावर सत्तेत आणण्याचा निर्धार करा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. 
या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार या कडे लक्ष लागले होते . शिवसेना सत्तेत बाहेर पडण्याची घोषणा आज होईल असे बोलले जात होते . मात्र ठाकरे यांनी  तशी काहीच घोषणा केली नाही .
ठाकरे म्हणाले की , सर्वसामान्य माणसासाठी लढाई लढतोय . समोर कोण आहे याची पर्वा नाही . संपूर्ण देशाच्या कारभाराचा विचका झालाय. आम्हाला सत्तेत का  आहात असे नेहमी विचारले जाते. आम्ही सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी सत्तेत आहोत . आम्ही सत्तेत राहून जनतेसाठी सामान्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला लावले  आहेत . जीएसटी संदर्भात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक नुकसान टळू शकले.