Breaking News

ट्रक-ट्रॅव्हल्स अपघातात दीक्षाभूमीला जाणारे 4 भाविक ठार

नागपूर, दि. 01, ऑक्टोबर - नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणार्‍या भाविकांच्या गाडीला आज शनिवारी पहाटे अपघात झाला ट्रॅव्हल्सची ट्रॅक्सला धडक होऊन  झालेल्या या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
नांदेड येथून दीक्षाभूमीवर जाणार्‍या क्रुजरला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने हा अपघात झाला. देवळी मार्गावरील सेलसुरा गावानजीक ही घटना घडली. या अपघातात  क्रूजरमधील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त नांदेड येथून क्रुझर गाडीने 11 जण नागपूरकडे जात होते. वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा जवळ भरधाव येणार्‍या टॅव्हल्सने ओव्हरटेक  करण्याचा प्रयत्न केल्याने हा भीषण अपघात झाला यात अरविंद मारोती खंडारे(33), दिलीप संभाजी खंडारे(35), शिवाजी शंकर ढगे(38), विठ्ठल खडसे(42)  यांचा मृत्यू झाला, तर अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.