Breaking News

पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यास प्रचंड गर्दी, भगवानगडावर मात्र शुकशुकाट

बीड, दि. 01, ऑक्टोबर - वंजारा समाजावर महंत नामदेव शास्त्रींपेक्षा गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे यांचाच प्रभाव कायम असल्याचे चित्र आज  भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव येथेत्यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला आलेल्या प्रचंड गर्दीमुळे पहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे भगवानगडावर पंकजा  मुंडे यांना मेळाव्यात भाषण करण्याला परवानगी नाकारल्यानंतर हा मेळावा सावरगाव येथे आयोजित करण्यात आला होता. भगवानगडावर दरवर्षीच्य दसर्यापेक्षा नगण्य  उपस्थिती आणि पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला मात्र प्रचंड गर्दी असे चित्र दिसून आले. आपण भगवानबाबांच्या जन्मभूमीने बोलावल्याने येथे समाजासाठी आलो  आहोत स्वतःसाठी आलेलो नाही असे भावनिक उद्गार पंकजा मुंडे यांनी यावेळी काढले. मंत्री झालो त्या दिवसापेक्षा आपल्याला आज जास्त समाधान वाटत आहे  असेही त्या म्हणाल्या. 
या प्रचंड गर्दीच्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद मिळत होता. त्या म्हणाल्या की, भगवान गडाची नाळ तुटली; आता बाबांचे जन्मस्थळ  हेच समाजाचे शक्तीस्थान. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे समर्थक महादेव जानकर व राम शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.