सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर विद्यापीठाची डी. लिट
सोलापूर, दि. 27 - संघर्षमय जीवनातून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविल्याबद्दल सोलापूर विद्यापीठातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली.
सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष दीक्षांत समारंभास राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह व्यासपीठावर सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कुलगुरु एन.एन. मालदार, परीक्षा नियंत्रक विभागाचे प्रमुख डॉ. बी. पी. पाटील, कुलसचिव पी. प्रभाकर उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन स्वकर्तृत्वाने मुख्यमंत्री, देशाच्या गृहमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान मिळविला. मिळालेल्या संधीचे सोने करुन त्यांनी सामान्य माणसासाठी काम करुन ओळख निर्माण केली.
सत्कारास उत्तर देताना श्री. शिंदे म्हणाले, सोलापूर माझी जन्मभूमी आहे. सोलापूरच्या मातीने मला घडविले असून सोलापूर विद्यापीठाने दिलेली डी. लिट पदवी ही माझ्या आईने दिलेली पदवी आहे, असे मला गौरवाने म्हणावे वाटते. सोलापूर विद्यापीठाने अल्पावधीत केलेली शैक्षणिक प्रगतीही कौतुकास्पद आहे. विद्यापीठाचे संशोधनाच्या क्षेत्रात होत असलेले काम समाधानकारक असून यापुढे त्यांनी वेगवेगळ्या संशोधनात भरीव काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सोलापूर विद्यापीठामुळे येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळाला असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली झाली याचे समाधानही वाटत असल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विद्यापीठाच्या बास्केटबॉल कोर्ट, व्हीव्हीआयपी अतिथीगृहाचे उद्घाटन आणि इलेक्ट्रॉनिक विभाग इमारत, बहुउद्देशीय सभागृह, आरोग्य केंद्र आणि 400 मीटर रनिंग ट्रॅकचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे, सिद्धराम म्हेत्रे, श्रीमती उज्वला शिंदे, विद्यापीठाचे सर्व विभाग प्रमुख, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व सन्माननीय नागरीक उपस्थित होते.