काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदुळ पकडला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
बुलडाणा, दि. 15, ऑक्टोबर - महसुल कर्मचार्यांचा संप सुरु असल्यामुळे ग्रामीण भागात अद्यापपर्यंत रेशनचा माल वितरीत झाला नसताना मेहकर तालुक्यातील मांडवा समेट डोंगर येथील रेशन माफीया शेषराव लालसिंग राठोड यांच्या दुकानातील सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदुळ दि.13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारे साडेआठच्या दरम्यान काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तेरा कट्यातील 5 क्विंटल 85 किलो एकूण किंमत 12870 रुपयांचा तांदुळ मेहकर पोलिसांनी पकडला आहे.
सदर प्रकरणी आरोपीर शेषराव राठोड, समाधान श्रीराम खवले, अॅपेचालक अमोल सुरेश कंकाळ या तिघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तु कायदा कलम 3,7 प्रमाणे पोलिस स्टेशन जानेफळ येथे गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणी कोतवाल रामेश्वर कचरु शिंदे यांनी जानेफळ पो.स्टे.चे ठाणेदार राहुल मोरे यांना दिलेल्या माहितीवरुन पोउनि रामेश्वर राठोड, पोहेकाँ शरद बाठे, डॉ.संदेश राठोड यांना पाठवून अॅपे क्र. एमएच-28 टी-2004 आरोपीसह ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.