Breaking News

पोलिसांच्या ताब्यात 313 बेवारस दुचाकी

पुणे, दि. 17, ऑक्टोबर - पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेवारस स्थितीत 313 दुचाकी आणि तीन चारचाकी वाहने अनेक दिवसांपासून पडली आहेत. ही सर्व  वाहने शिवाजीनगर येथील मोकळ्या मैदानावर ठेवण्यात आली आहेत. ही वाहने ज्यांची असतील त्यांनी दोन महिन्याच्या मुदतीत या वाहनांची कागदपत्रे लष्कर पोलीस स्टेशमधील व रिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासमक्ष दाखवून आपली मालकी सिध्द करावी. अन्यथा दोन महिन्यानंतर ही वाहने शासनाच्या मालकीची समजून त्यांचा जाहीर लिलाव करण्यात येईल,  असे पुणे पोलिसांच्या वतीने जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. या वाहनांची यादी पुणे पोलिसांच्या र्िीपशिेश्रळलश.र्सेीं.ळप या वेबसाईटवरही प्रसिध्द करण्यात आली आहे.  पोलीस प्रशासनाच्या वतीने जारी केलेल्या मुदतीत सदरील वाहनांवर मालकी हक्क सिध्द न झाल्यास ही वाहने जाहीर लिलावाद्वारे विकण्यात येतील, असे पुणे पोलिसांच्या वतीने  दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.