Breaking News

पाचपाखाडीत गड किल्ले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

ठाणे, दि. 17, ऑक्टोबर - ठामपा परिवहन समिती सदस्य राजेश मोरे व नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्यावतीने चंदनवाडी-पाचपाखाडी परिसरातील मुलामुलींसाठी गड किल्ले  स्पर्धा 2017 व रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या स्पर्धेचे वैशिष्टय म्हणजे विजेत्या  स्पर्धकांचा पारितोषिक वितरण सोहळा गड किल्ल्यांवरच करण्यात येतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशासाठी केलेल्या महान कार्याचा उलगडा व्हावा, त्यांचा परिपूर्ण इतिहास समजावा या उद्देशाने खंडित होत असलेल्या सांस्कृतिक परंपरांचे  पुनुरुजीवन करण्यासाठी सालाबादप्रमाणे यावर्षीही प्रभागातील वयोगट 8 ते 16 वर्षे मुलांमुली, सोसायटी आणि मंडळासाठी भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर  स्पर्धेचा पारितोषीक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्तिथीत गड किल्ल्यावरती करण्यात येतो. तरी आपण या स्पर्धेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ए -1 / 02, दांडेकर  दत्तछाया सोसायटी, संत ज्ञानेश्‍वर मार्ग, पांचपाखाडी, ठाणे (प.) 400 602 022- 65672 999 येथे संपर्क साधावे.