Breaking News

वीजबिल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घोटाळा करणा-यांवर गुन्हा दाखल

ठाणे, दि. 01, ऑक्टोबर - ऑनलाईनने भरलेले वीजबिल एमएसईबीमध्ये जमा न होता लाखोंच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी सॉफ्टवेअर पुरवणार्‍या तीन  जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहीत खोसे याने कोनगाव परिसरातील 558 वीज ग्राहकांची 5 लाख 46 हजार  रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार वीजबिल भरणा केंद्राचे निलेश म्हात्रे याने केली आहे.
कोनगावच्या ग्रामीण परिसरातील वीजग्राहकांना कल्याण येथे वीजबिल भरण्यासाठी जाणे त्रासदायक असल्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन स्वरुपात वीजबिल भरण्याचा  पर्याय स्विकारला होता. मात्र, भरणा केलेले मागच्या महिन्याचे वीजबिल चालू महिन्याच्या पुन्हा आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच  वीजग्राहाकांनी वीजबिल भरणा केंद्रावर धाव घेतली. भरणा केलेल्या रक्कमेचा परतावा करण्याची मागणी केली.