Breaking News

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा लावणा-या दोन व्यक्तींना अटक

ठाणे, दि. 01, ऑक्टोबर - भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पार्श्‍वभूमीवर सट्टा घेणार्‍या दोनजणांना पोलिसांनी अटक केली  आहे. तर मुख्य बुकीचा शोध सुरू आहे.कौशिक अरविंद भानुशाली आणि जतीन कांतीलाल शहा अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे असून दोघेही  डोंबिवलीत राहतात. अधिक चौकशीकरिता कल्याण न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मोबाईलद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून ही बेटींग घेण्यात येत  असल्याचे समोर आले आहे. बुकींचा म्होरक्या कमलेश हा नवी मुंबईत राहणारा आहे. पकडण्यात आलेले बुकी कौशिक व जतीन यांच्यासह अनेक बुकी मोबाईलच्या  माध्यमातून संपर्कात असल्याचेही चौकशीदरम्यान उघडकीस आले.