Breaking News

पाणवठ्यांवर आढळतात 284 प्रकारचे पक्षी

सोलापूर, दि. 01, ऑक्टोबर - वातावरणात होणार्‍या बदलांचा पक्ष्यांना सर्वप्रथम अंदाज येतो. सायबेरियातील सर्व भूभाग बर्फाने आच्छादित होऊ लागल्यावर पक्षी  त्यांच्या प्रवर्गानुसार स्थलांतरास सुरुवात करतात. काही पक्षी हजारोंच्या थव्याने सीमोल्लंघन करून सोलापुरात येतात. हिवाळ्यात शहर परिसरातील पाणवठ्यांवर  सुमारे 284 प्रकारचे स्थानिक स्थलांतरित पक्षी आढळतात. सोलापुरातआढळणारे पक्षी शहरपरिसरातील पाणवठ्यांवर सुमारे 284 प्रजातींचे पक्षी आढळतात, अशी  नोंद येथील विहंग मंडळाने केली आहे. त्यामध्ये 165 स्थानिक प्रजातींचे पक्षी आहेत. 94 प्रजाती स्थलांतरित आहेत. त्यामध्ये सायबेरिया देशातून भारतामध्ये  स्थलांतरित होणार्‍या पक्ष्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये पीनटेल डक (तलवार बदक), शोवलर डक (धापट्या), कॉमनटील (चक्रांग), दाबचिक (टिबुकली),  मेलॉर्ड (चतुरंग), पोकार्ड (लालसरी), गारगनीटिल (भुवईबदक) हा पक्षी दक्षिण-उत्तर मध्य आशिया खंडातून येतो. लेसर व्हिसलिंग डक (अडई), कॉमन सैंड  पाइपर (सामान्य तुतारी), मार्श सॅण्डपायपर (दलदली तुतारी), ग्रीन सॅण्डपायपर (हिरवी तुतारी) फ्लेमिंगो (रोहित).
रोजी स्टर्लिंग (भोरडी) आफ्रिका खंडातून ज्वारीवरील किडे खाण्यासाठी येतात. - बार्न शॅलो, वायरटेल शॅलो, रेड रम्पड् शॅलो, हाऊस मार्टीन हे पक्षी आफ्रिका  खंडातून येतात. सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान आढळतात. - गोल्डन ओरिओल (हळद्या) युरोप खंडातून येतो. - युरोपियन रोलर (नीळकंठ)  नोव्हेंबर दरम्यान दहा ते पंधरा दिवसांपुरतेच सोलापूर परिसरातही दिसतात. - फक्त समुद्र परिसरातील दलदलीत आढळणारे रिफ इग्रेट (समुद्री बगळा) हा पक्षी  यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच सोलापुरातील पाणथळावर आढळला. - बारहेडेड गीज : हे पक्षी मध्य आशिया आफ्रिका खंडातून येतात. उंचावरून हे पक्षी उडतात.  दमझाएल क्रेन (कांड्या करकोचा) : तेलबिया खाण्यासाठी हे प्रामुख्याने आपल्याकडे हे पक्षी येतात. - अमूर फालकन : हा शिकारी पक्षी असून आपल्याकडे  पहिल्यांदाच आढळला. युवा पक्षीमित्र अभिषेक देशपांडे यास चार वर्षांपूर्वी अक्कलकोट तालुक्यात हा पक्षी आढळला होता.