Breaking News

राज्यपालांकडून जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 18, ऑक्टोबर -राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दीपावलीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील माझ्या सर्व नागरिक बंधू - भगिनींना तसेच जगात इतरत्र वास्तव्य करीत असलेल्या मूळच्या महाराष्ट्रातील लोकांना मी दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. दिवाळीचा  सण ज्ञानाचा अज्ञानावर, प्रकाशाचा अंध:कारावर तसेच इष्ट प्रवृत्तींचा अनिष्ट प्रवृत्तींवर विजयाचे प्रतिक आहे. हा उत्सव सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि संपन्नता घेऊन येवो  तसेच सर्वांमध्ये एकात्मतेची भावना वृद्धिंगत करो अशी मी आशा व्यक्त करतो. या सणाचा आनंद उपेक्षितांपर्यंत पोहोचविण्याचा आपण प्रयत्न करुया, असेही राज्यपालांनी आपल्या  संदेशात म्हटले आहे.