Breaking News

कामठीतील 27ग्रामपंचायतींवर भाजपचा कब्जा; बवनमुळेंनी राखला गड

नागपूर, दि. 18, ऑक्टोबर - नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदासंघात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 40 पैकी27 ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा केला  आहे. काँग्रेसला केवळ 11 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवता आल्या. तर शिवसेनेला मौदा तालुक्यात 2 ग्रामपंचायतीं मिळविण्यात यश मिळाले आहे. भाजपच्या विजयी सरपंचांचे  आणि विजयी सदस्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदन केले आहे.कामठी तालुक्यात एकूण 27 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होती. यापैकी 18 ग्रामपंचायतींवर  भाजपचे सरपंचासह 100 टक्के उमेदवार विजयी झाले आहे. यात खसाळा, खैरी, भिलगाव, खापा, रनाळा, गादा, आवंढी, सोनेगाव, परसाड, दिघोरी, कापसी, आडका, केम, शिवनी,  तरोडी, वडोदा, भूगाव, जाखेगाव, तर मौदा तालुक्यातील माथनी, चिरव्हा, गोवरी, महालगाव, धानोली, कोदामेंढी, नांदगाव. नागपूर ग्रामीण मधील उमरगाव आणि जामठा या  ग्रामपंचायतींवर भाजपाने आपला झेंडा फडकवला आहे.या निवडणुकीत कामठी तालुक्यात काँग्रेसचे 10 सरपंच विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीच्या या निवडणुका झाल्या असून  सरासरी 60 ते 70 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील गावांमध्ये एक उत्साह संचारला होता.कामठी तालुक्यातील भाजपाचे विजयी सरपंच- खसाळा- रवी  पारधी, खैरी- बंडू कापसे, भिलगाव-स्वाती संदीप पाटील, खापा पाटण- मनोरमा वर्हाडे, रनाळा- सुवर्णा साबळे, गादा- प्रमिला शेंडे, आवंढी- शालू मोहोड, सोनेगाव- चंदू हेवट,  परसाड- उज्ज्वला भीमराव पाटील, दिघोरी- वैशाली डाफ, कापसी- श्यामराव आडोळे, आडका- सौ. स्वर्णा चांभारे, केम-वनिता शेंडे, शिवनी- भगवान कोरडे, तरोडी- अरविंद फु लझेले, वडोदा-वनिता इंगोले, भूगाव- सविता बाळबुधे, जाखेगाव- राजेश्‍वर आखरे,बवनमुळेंचे परिश्रम फळालाग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर  बावनकुळे व भाजपचे स्थानिक पदाधिकार्यांनी जिल्ह्यात शेकडो बैठकी घेऊन मतदारांशी संपर्क केला होता. पालकमंत्र्यांनी निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये दररोज  दौरे करून आढावा घेतला. शासनाच्या योजना आणि ग्रामीण भागात झालेली कामे गावकर्यांपर्यंत पोहोचली.