Breaking News

नोटा रद्दच्या निषेधार्थ आझाद मैदानात निदर्शने; मुंबईत बैठकीचे आयोजन

मुंबई, दि. 27, ऑक्टोबर - केंद्र सरकारने घेतलेल्या नोटा रद्दच्या निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष होत आहे. या निर्णयामुळे विविध समाजघटकांना अतोनात त्रास झाले. या  निर्णयाचा निषेध करण्यासाठी अनेक समविचारी मंडळी देश व राज्यात विविध ठिकाणी 8 नोव्हेंबर रोजी निदर्शने करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आझाद मैदानात 8  नोव्हेंबर दुपारी 2 ते 5 या वेळेत निदर्शने केली जाणार आहेत.
या निदर्शनाची तयारी करण्यासाठी 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता श्रमिक, पहिला माळा, रॉयल क्रेस्ट, दादर क्लबसमोर, लो. टिळक वसाहत, रस्ता क्र. 3, दादर  (पूर्व) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या निदर्शनात सहभागी होण्याची इच्छा असणा-यांनी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात  आले आहे.