Breaking News

एसटी महामंडळाच्या अतांत्रिक पर्यवेक्षकीय पदाची परिक्षा 28, 29 ऑक्टोबर रोजी

मुंबई, दि. 27, ऑक्टोबर - एसटी महामंडळातील अतांत्रिक पर्यवेक्षकीय पदाची परिक्षा 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जानेवारी 2017 मध्ये एसटी महामंडळामार्फत  रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती.
यात विविध रिक्त पदाच्या जाहिरातीमधील 313 अतांत्रिक पर्यवेक्षक पदासाठी 28 आणि 29 ऑक्टोबरला परिक्षा आहे. यात 38 हजार 418 परीक्षार्थींची ऑनलाईन परीक्षा तीन  सत्रात म्हणजे सकाळी 9 ते 10.30, दुपारी 12.30 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते 5.30 दरम्यान घेण्यात येणार आहे.