Breaking News

महावितरणच्या तपासणी मोहिमेत वीज चोरीचे 93 गुन्हे दाखल

औरंगाबाद, दि. 27, ऑक्टोबर - महावितरणच्या तपासणी मोहिमेत 93 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर 10 हजार 806 ग्राहकांचे वीज मीटर तपासण्यात आले. सोमवार पासून या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली. 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी सहाशे कर्मचार्यांनी शहरातील विविध भागातील वीज मीटरची तपासणी केली. या तपासणीत कलम 126 नुसार एकूण 18, तर कलम 135 वीज चोरीच्या कलमानुसार 75 वीज ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय 154 वीज मीटर जप्त करण्यात आले, तर 471 वीज ग्राहकांचे वीजमीटर जागेवर बदलून देण्यात आले. बिल न भरल्यामुळे818 वीज ग्राहकांची वीज कापण्यात आली.
तपासणी मोहिमेत शहरातील एका भागात पथकाने सुरुवातीला पंधरा घरांची तपासणी केली. या तपासणीत पंधरा घरांमध्ये वीजचोरी आढळली. पंधरा कनेक्शनची पाहणी केल्यानंतर संपूर्ण चारशे घरांची वीज तपासणी करण्यात आली.