Breaking News

मामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार

बीड, दि. 17, ऑक्टोबर - लग्नाचे आमिष दाखवून मामाने अल्पवयीन भाचीवर अत्याचार करणार्या मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारावीच्या वर्गात शिकणाव्या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा सख्खा चुलत मामा दिलीप बालासाहेब गायकवाड हा पिडीतेच्या घरी येत असे दोघांचे प्रेम जमले. दिलीप गायकवाड  याने मार्च 2017 मध्ये शहरातील पाण्याची टाकी भागातील बांधकाम सुरु असलेल्या घरात पिडीतेला बोलावून घेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर  एमपीएससीच्या अभ्यासासाठी लातूर येथे असतानाही त्याने अनेकदा पिडीतेवर अत्याचार केला. तु मोठी झाल्यानंतर आपण लग्न करू असे तो म्हणत असे. त्यानंतर त्याने तिच्याशी  संपर्क बंद ठेवला. आपली फसवणूक झाल्याचे पिडीतेच्या लक्षात आल्यानंतर तिने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पिडीतेच्या तक्रारीवरून दिलीप गायकवाड याच्यावर  आज बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 4, 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.