Breaking News

चॉकलेटच्या आमिषाने 6 वर्षीय मुलीवर 15 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार

पुणे, दि. 27, ऑक्टोबर - सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या आमिषाने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दौंड  तालुक्यातील कानगाव येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी  अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी खेळत असताना आरोपी मुलानेॉकलेट देण्याच्या आमिषाने एका रिकाम्या घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या  आईला ही घटना समजताच तिने यवत पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक  पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.