Breaking News

आ. कोल्हे यांच्या हस्ते कृषी यंत्रसामग्री व बियाणांचे वाटप

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - सन2016-17या वर्षात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत कोपरगाव तालुक्यात यावर्षी 61.74 लाख रुपयांचे अनुदान ट्र्क्टर व रोटाव्हेटर  यासाठी वाटप करण्यात आले.यामध्ये 22 ट्र्क्टर व 74 रोटाव्हेटर व इतर औजारांचा समावेश होता. 
या सर्व कृषी औजारे, बियाणे, किटकनाशके यांचे वितरण कोपरगाव तालुक्याच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी ज्वारीसाठी 500 हेक्टर क्षेत्रावर 16लाख इतक्या अनुदानाचे बियाणे सुक्ष्ममुलद्रव्ये, किटकनाशके व इतर निविष्ठा यांचे यावेळी वितरण करण्यात  आले.
हरभरा प्रकल्पासाठी 290 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले.शेतकरी गटांना या योजने अंतर्गत 23.84 लाख एवढे अनुदान अदा करण्यात येणार आहे. प्रतिनिधिक स्वरुपात  सवंत्सर येथील गटांना हरभरा बियाणे वाटप करण्यात आले.
यावेळी संजीवणी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे,तालुका शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष मच्छींद्र केकाण, कारखान्याचे संचालक ज्ञानेश्‍वर परजणे, अशोक भाकरे, नगरसेवक  रविंद्र पाठक, भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात, उत्तमराव चरमळ, तालुका कृषी आधिकारी मनोज सोनवणे आदींसह कृषी विभागाचे कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.