Breaking News

‘सिध्देश्‍वर’कडून 40 लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - संकलन व भाव यांच्यात कायम अग्रेसर असणार्‍या अकोले येथील सिद्धेश्‍वर दूध डेअरीकडून 40 लाख 26 हजार 638 रुपये सभासदांच्या  खात्यावर वर्ग केले गेले आहेत, अशी माहिती या डेअरीचे अद्यक्ष संदीप शेटे व उपाध्यक्ष अनिलर जनार्धन गायकवाड यांनी दिली. संस्थेचे मार्गदर्शक व बुवासाहेब नवले पतसंस्थेचे  संस्थापक मधुकर नवले यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल उज्वल भविष्याकडे सुरु आहे, असेही ते म्हणाले. 
एक एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या काळातील दूध उत्पादकांना संचालक मंडळाने प्रति लिटर 4.50 रुपये रिबेट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापोटी देय असणारी 18 लाख  86 हजार 510 रुपयांची रक्कम ही दूध उत्पादकांच्या खात्यात वर्ग केली गेली आहे असे सांगून ते म्हणाले, एक ऑक्टोबर 2016 ते 30 सप्टेंबर 2017 याकाळात दीपावली   संचयनीसाठी प्रतिलिटर 4 रुपयांनी कपात केली गेली होती.
ती जमा झालेली रक्कम 17 लाख 61 हजार 42 रुपये ही रक्कम सभासदांना दिली गेली.असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 16 सप्टेंबर 17 ते 30 सप्टेंबर 17 या 15 दिवसांची  दूध पेमेंटची रक्कम  3 लाख 79 हजार 86 हजार रुपये होते. अशी एकूण 40 लाख 26 हजार 638 रुपयांची रक्कम सभासदांना दिली गेली आहे. असे या संस्थेचे सचिव रामनाथ  मंडलिक यांनी सांगितले.