Breaking News

यात्रा ऑनलाईन’ कंपनीकडून अजिंठा लेण्यांचे संवर्धन

मुंबई / नवी दिल्ली, दि. 27, ऑक्टोबर - केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वारसास्थळ दत्तक योजने’अंतर्गत राज्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे संवर्धन होणार आहे. यात्रा आ ॅनलाईन प्रायव्हेट लिमीटेड’ या कंपनीची या कामासाठी निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने येथील राजपथ लॉनवर आयोजित पर्यटन पर्व’ कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी देशातील 14 स्मारकांच्या संवर्धनासाठी 7 कंपन्यांच्या निवडीची  घोषणा करण्यात आली. राज्यातील औरंगाबाद जिल्हयातील प्रसिद्ध अजिंठा लेणीच्या विकासासाठी यात्रा ऑनलाईन प्रा.लि.’ कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही कं पनी स्मारक मित्र’ म्हणून ओळखली जाणार असून सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) अजिंठा लेणीच्या ठिकाणी पर्यटन पूरक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. या  लेण्यांच्या संवर्धनासाठी काम करणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या वर्षी 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिना’निमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या  समन्वायातून देशातील स्मारकांच्या विकासासाठी खाजगी कंपन्यांच्या सहभागातून संवंर्धन व विकासासाठी ॠवारसास्थळ दत्तक योजने’ची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशातील  14 स्मारकांच्या विकासासाठी खाजगी कंपन्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, देशभरातून 57 कंपन्यांचे अर्ज मंत्रालयाकडे प्राप्त झाले होते यापैकी 7 कंपन्यांची निवड क रण्यात आली.  इ.स.पूर्व 200 ते 650 या काळातील अजिंठा लेणी कोरीव काम व रंगीत भित्तीचित्रासाठी जगप्रसिद्ध आहेत. याठिकाणी कोरीव काम असलेली बौद्ध मंदिरे, गुंफा,  बुद्धांच्या जीवनातील कोरलेले अनेक प्रसंग आश्‍चर्यचकित करणारे आहेत.