Breaking News

विविध मागण्यांसाठी कोकण विकास मंचच्या वतीने कॅडल मार्च

ठाणे, दि. 28, ऑक्टोबर - ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी कोकण विकास मंच च्या वतीने ठाणे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंच चे संचालक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. शासनाचे या मागण्यांबाबत लक्ष  वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयापासून कोर्ट नाका मार्गे जांभळी नाका - शिवसेना जिल्हा शाखा मार्गे - भवानी माता चौक मार्गे जिल्हाधिकारी असा कॅडल मार्च क ाढण्यात आला.