Breaking News

असुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई 16 व्या स्थानी

मुंबई, दि. 01, नोव्हेंबर - असुरक्षित शहरांच्या यादीमध्ये मुंबईचा 16 वा क्रमांक लागत आहे. तर त्या पाठोपाठ दिल्लीचा 18 वा क्रमांक लागत आहे. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स यु निटने ‘सेफ सिटीज इंडेक्स 2017’ ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात जगातील 60 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
आरोग्य, पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तित सुरक्षितता या मुद्द्यांवरुन जगातील 60 शहरे निवडण्यात आली असून यात मुंबई 16 वा स्थानी आहे. दुसरीकडे सुरक्षित  शहरांमध्ये जपानमधील टोकियो हे अव्वलस्थानी, तर सिंगापूर दुसर्‍या क्रमांकावर आहे. सुरक्षित देशांच्या यादीत दिल्ली 43 व्या तर मुंबई 45 व्या क्रमांकावर आहे.