Breaking News

15 फूट शिव, 25 फूट पिंडीसमोर सोलापुरात प्रथमच महादीपोत्सव

सोलापूर, दि. 24, ऑक्टोबर - सोलापुरात पहिल्यांदाच कार्तिक महादीपोत्सव आयोजित केला आहे. कर्णिकनगर येथील साडेचार एकरांच्या मोकळ्या मैदानात त्याची जय्यत तयारी  सुरू झाली. दर्शनीभागात 25 फूट उंच शिवलिंग आणि 15 फूट उंच महादेवाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. परिसरात 68 लिंग स्थापन करण्यात येत असून, ग्रामदैवत  सिद्धरामेश्‍वर आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या मोठ्या मूर्तीही ठेवण्यात येणार आहेत. 30 ऑक्टोबर ते 5नोव्हेंबर असा सहा दिवसांचा हा उत्सव असून,  त्यासाठी लाख भाविक येतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला. श्री ओम चॅरिटेबल फाउंडेशनने त्याचे नियोजन केले. प्रसिद्ध मूर्तिकार राजू गुंडला त्याचे संस्थापक आहेत.  रवी दलसिंगे अध्यक्ष असून, विजय महिंद्रकर (सचिव), सदानंद पिस्का, हरिदास बुटला, अंबरिश बरडे, विजयलक्ष्मी बुटला आदी त्यासाठी प्रयत्नशील आहेत. महोत्सव काळात  नित्य होमहवन, रूद्राभिषेक, कल्याणोत्सव, प्रचवन आणि रात्री दीपोत्सव असा कार्यक्रम आहे. त्यासाठी दररोज एका महनीय व्यक्तीला निमंत्रित केले. त्यात काशी जगद्गुरू डॉ.  चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, गौडगावचे डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, आंध्र प्रदेशातल्या माता शिवचैतन्यानंद, गहिनीनाथ महाराज औसेकर, सुधाकर महाराज इंगळे आदींचा  समावेश आहे. कर्णिकनगर येथील साडेचार एकरांच्या मोकळ्या मैदानात कार्तिक महादीपोत्सवाची तयारी सुरू आहे. दर्शनी भागात 25 फूट उंच शिवलिंग आणि 15 फूट उंच  महादेवाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.