Breaking News

शहरातील सर्व स्थळांची माहिती एका क्लिकवर

सोलापूर, दि. 24, ऑक्टोबर - सोलापूरचे ब्रँडिंग करण्याची भाषा नुसतीच बोलली जात होती. मात्र आता ती महापालिकेने प्रत्यक्षात उतरवली आहे. शहरातील सर्व स्थळांची माहिती  एका क्लिकवर मिळेल. असे स्मार्ट इन्फॉर्मेटिव्ह किऑस्क यंत्र एसटी स्टँड, सिद्धेश्‍वर मंदिर परिसर महापालिकेच्या आवारात बसवले आहे. रेल्वे स्टेशनवर बसवण्यासाठी प्रस्ताव  दिला होता. मात्र त्यांनी भाडे मागितल्यामुळे रद्द झाला.दररोज 500 जण माहिती घेत असल्याचे सुखद चित्रही समोर आले आहे. संगणकीय यंत्रावर होम पेजवर छायाचित्रे, शिक्षण,  पर्यटन, वारसा, आरोग्य, मनोरंजन, आपले सोलापूर, आपत्कालीन नंबर, आमचा संघ, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, प्रसिद्ध व्यक्ती असे विभाग दिसतात. फलक लावावा मुंबईहून कु टुंबासोबत देवदर्शनासाठी आलो. बसस्थानकात चौकशी करत असताना मला सांगण्यात आले की, मशीनवर सर्व माहिती उपलब्ध आहे. या मशीनमुळे माहिती मिळणे सोपे झाले.  मशीनची माहिती देणारे सूचना फलक लावल्यास बाहेरून येणार्‍यांना सोयीचे होईल.मशीनचा मक्ता सातार्‍याच्या विजय सेल्स कंपनीला तीन वर्षांच्या देखभालीसाठी 7.50 लाखांसाठी  दिला आहे. हे 22 सप्टेंबरला बसवलीे. रोज साधारण 500 च्या जवळपास लोक लाभ घेतात. स्मार्ट फोन नसणार्‍यांना एका क्लिकवर माहिती मिळते. त्यामुळे बाहेरून येणार्‍यांची  चांगली सोय झाली आहे,- तपन डंके, सहायक अभियंता