Breaking News

सात वर्षापूर्वी झालेल्या अपघाताप्रकरणी तरुणाला 1.2 कोटींची नुकसानभरपाई मिळणार

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - सात वर्षांपूर्वी रस्ते अपघातात आईवडिलांना गमावणार्‍या तरुणाला नुकसानभरपाई म्हणून 1.2 कोटी रुपये देण्याचे आदेश मोटर अपघात दावा न्याया धिकरणाक़डून देण्यात आले आहेत. संबंधित तरुण बेरोजगार असून तो उच्च शिक्षण घेत आहे.
मुंबई-ठाणे महामार्गावर 28 ऑक्टोबर 2010 रोजी एका ट्रकने चारचाकीला धडक दिली होती. या अपघातात विनीत गावकर याचे वडील,आई आणि अन्य एका नातेवाईकाचा मृत्यू  झाला होता. हा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला होता, असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी विनीतने ट्रक मालक, चालक बरकतुल्लाह खान आणि ओरिएंटल विमा  कंपनीविरोधात डिसेंबरमध्ये न्यायाधिकरणात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. कोणतेही संकेत न देता महामार्गावर ट्रक उभा केल्याने  अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुऴे न्यायाधिकरणाने विनीतच्या आईवडिलांचे वार्षिक उत्पन्न आणि गेल्या सात वर्षांतील हिशेबाप्रमाणे व्याजाची रक्कम अशी नुकसानभरपाई  देण्याचे आदेश संबंधितांना दिले.