Breaking News

गोव्यातही मुसळधार पाऊस

गोवा, दि. 21, सप्टेंबर - गेल्या पाच दिवसांपासून पावसाने सुरु केलेले धूमशान काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काल मंगळवारीही संपूर्ण राज्याला  पावसाने झोडपून काढले. 21 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला आहे. गोव्यातील सर्व नदी-नाले दुथडी  भरून वाहत आहेत. साळावली, अंजुणे, आमठाणे व पंचवाडी ही धरणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे धरणाचे दरवाजे खोलण्यात आले असून राज्य सरकारने जनतेला  पूरसदृष्य परिस्थितीबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.
परतीच्या पावसाने राज्यात सर्वत्र थैमान घातलेले आहे. सोमवारी रात्री उशिरा सुरु झालेला पाऊस बुधवारी दुपारपर्यंत सर्वत्र चालू होता. पेडण्यात सर्वाधिक 11 से.  मी. पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या जोरदार पावसामुळे गेल्यावर्षीची सरसरी भरून काढण्यासाठी आता फक्त 15 इंच पावसाची गरज आहे. वाळपईत पावसाने  132 इंच पूर्ण केले आहे. साखळीत पावसाने शतक गाठले. पेडणे, म्हापसा दोन्ही ठिकाणी आज पाऊस शतक ओलांडण्याची शक्यता आहे.