Breaking News

अमेझॉनवर आजपासून ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल

मुंबई, दि. 21, सप्टेंबर - ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनंतर आता अमेझॉन इंडियाचा देखील सेल सुरु झाला आहे. सण आणि उत्सवाचा मुहूर्त साधत  अमेझॉननं ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ हा सेल सुरु केला आहे. हा सेल 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत.  तसंच एचडीएफसीच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. मात्र ही कॅशबॅक यूजर्सच्या खात्यात 24 डिसेंबर  2017ला जमा होणार आहे.
या सेलमध्ये 4जी स्मार्टफोन्सशिवाय फ्रिज आणि अनेक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवर भरघोस सूट देण्यात आली आहे. तसेच अमेझॉनच्या अ‍ॅपवरुन खरेदी केल्यास  यूजर्सला आणखीही काही सरप्राईज ऑफर मिळणार आहेत. 500 रुपयांहून अधिक खरेदी केल्यास यूजर्सला अनेक खास ऑफर मिळणार आहे. या सेलमध्ये  स्मार्टफोन्सवर तब्बल 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.