Breaking News

मी स्वत:हूनच राजीनामा दिला - कलराज मिश्र

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास सांगितले होते . त्यामुळे मी काल  पंतप्रधानांची भेट घेऊन स्वत:हूनच राजीनामा सोपवल्याचे केंद्रीय उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. कलराज मिश्र यांनी शुक्रवरी  आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला. त्याबाबत विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. 
कलराज मिश्र हे मोदी सरकारमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत . वयोमानामुळे प्रभावीरित्या सक्रिय राहता येत नसल्याने आपण स्वत: राजीनामा देण्याचा  निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. कलराज मिश्र यांच्यासह बंडारू दत्तात्रय, राजीव प्रताप रूडी , संजीव बलीयान व फगन सिंह कुलास्ते आदींनी आपल्या पदाचा  राजीनामा दिल्याचे समजते. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काही मंत्र्यांनी आपले राजीनामे पंतप्रधानांकडे सोपवले आहेत.