Breaking News

विहित मुदतीत विवरण पत्र सादर करू न शकणा-या व्यापा-यांना दंडात सूट

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - वस्तू व सेवा कर प्रणाली अंतर्गत आतापर्यंत अनेक व्यापारी व कंपन्यांनी ऑनलाईन विवरण पत्र सादर केले आहे. यापैकी काही  व्यापा-यांनी अद्याप विवरण पत्र सादर केलेले नाही. अशा व्यापा-यांना विवरण पत्र सादर करण्यात झालेल्या विलंबाबाबत दंड न आकारण्याचा निर्णय सरकारने  घेतला आहे. या निर्णयामुळे व्यापा-यांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय उत्पादन मंडळ व सीमाशुल्क विभागाने या संदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. जुलै महिन्यात विवरण पत्र सादर करण्यासाठी 25 ऑगस्ट ही शेवटची  तारीख होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे काही व्यापा-यांना विवरण पत्र सादर करता आले नाही. अशा व्यापा-यांना सूट देण्यात आली आहे. नियमानुसार  विहित मुदतीत विवरण पत्र सादर न केल्यास दररोज 200 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.