Breaking News

काश्मीरमधील चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार

श्रीनगर, दि. 03, सप्टेंबर - जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी इशफाक पड्डेरा ठार झाला. लेफ्टनंट  उमर फैयाज यांच्या हत्येत तो सहभागी होता असे सांगितले जात आहे . त्याच्याजवळ असलेली एके-47 जप्त करण्यात आली आहे. लष्कराकडून ट्विटच्या  माध्यमातून ही माहिती देण्यात आली. दक्षिण काश्मीरमधील पोलीस उपमहानिरीक्षकांनीही याबाबतचे ट्विट केले आहे.
कुलगाममधील चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहेत, असे ट्विट लष्कराकडून करण्यात आले आहे. चकमक  संपली असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिली आहे. फैयाज यांच्या हत्येनंतर इशफाकचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाकडून मोंहिम राबवली जात होती.