Breaking News

खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे छत कोसळले

खेडगाव, दि. 02, सप्टेंबर - दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे छताचे प्लॅस्टर कोसळल्याने सरकारी इमारतीचे प्रश्‍न  ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात नागरिकांचा वावर असलेल्या शासकीय इमारती धोकादायक झालेल्या असुन रुग्णांची सुरक्षिता वार्‍यावर आली आहे. सतत सुरू  असलेल्या पावसामुळे खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे छताचे प्लॅस्टर अचानक कोसळले. आरोग्य केंद्रात फारशी गर्दी नसल्याने सुदैवाने  कोणतीही हानी झाली नाही. 
या घटनेची माहिती मिळताच खेडगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य धनराज महाले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच झालेल्या दुर्घटनेची  माहिती घेतली. सदर इमारत 32 वर्षाची झाली असून चार महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दाखल करण्यात आला असुन देखील यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.  ग्रामीण भागाची जीवनरेषा असलेल्या आरोग्य केंद्राची इमारती सुरक्षित राहिलेल्या नसल्याचे वास्तव समोर आले आहे.तरी आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या समस्या  लवकरच पाठपूरावा करून सोडविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
अपूर्ण औषधसाठा वाढून मिळवा तसेच पंचक्रोशीतील रुग्ण येथे उपचारासाठी येत असल्याने सुविधा वाढविण्यात यावे अशी मागणी रुग्णांच्यावतीने याप्रसंगी करण्यात  आल्या. यावेळी सहकार नेते सुरेश डोखळे, जयराम डोखळे पं.समिती सदस्य एकनाथ खराटे, रुग्ण कल्याण समिती सदस्य सागर गांगुर्डे, वैद्यकीय अधिकारी देशमुख  यांच्यासह ग्रामस्थ व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
जिल्ह्यातील 25 आरोग्य केंद्रांच्या इमारती धोकादायक झालेल्या असून, कधीही कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते यात 13 प्राथमिक आरोग्य केंद्र तर 12  उपकेंद्रास्ताव आहे. या इमारती पाडण्यासाठी त्यांच्या निर्लेखानाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेत प्राप्त झालेले आहेत मात्र मंजुरी अभावी सदर प्रस्ताव पडून आहेत.