Breaking News

ईद -उल- जुहा निमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - ईद -उल- जुहा म्हणजेच बकरी ईद निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून  देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ईद -उल- जुहा निमित्त देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा. विशेषत: भारतात आणि परदेशात राहणा-या मुस्लिम मुस्लीम बंधू - भगिनींना ईद -उल- जुहा निमित्त  हार्दिक शुभेच्छा, असे राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
आपल्या समाजात ऐक्य, सुसंवाद आणि बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी, असे नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी ईद -उल- जुहा निमित्त देशवासियांना शुभेच्छा  दिल्या आहेत.