Breaking News

उत्तर प्रदेशमधील बालमृत्यू प्रकरणी डॉ. काफील खान यांना अटक

लखनौ, दि. 02, सप्टेंबर - उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात प्राणवायूच्या कमतरतेमुळे झालेल्या बालमृत्यू प्रकरणी डॉ.  काफील खान यांना येथील विशेष कृती दलाकडून शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना गोरखपूर पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे. या प्रकरणी आत्तापर्यंंविरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ.कफील यांना लखनौमधून पकडण्यात आले. गेल्या 15 दिवसांपासून काफिल फरार होते. या महाविद्यालयात थकीत बिल न  भरल्याने प्राणवायूचा पुरवठा करणार्‍या कंत्राटदार कंपनीने प्राणवायूचा पुरवठा थांबवला होता. डॉ. खान यांनी रुग्णालयातील प्राणवायू सिलिंडर चोरून आपल्या  खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे. त्यांच्या या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे 70 पेक्षा अधिक  रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 35 पेक्षा अधिक लहान मुलांचा समावेश होता. सध्या एकूण 114 बालके नवजात बालकांसाठीच्या अति दक्षता विभागात असून  चिकित्सा अति दक्षता विभागात 240 जण आहेत.